Friday, June 1, 2007

समस्त बामन समाजाचं सरकारला पत्र

मायबाप सरकारास्नी,
रामराम.

तुमास्नी आमचं येकच सांगनं हाये की आमचे जोशी देशपांडे कुलकर्णी झालच तर अभ्यंकर, रानडे, दामले याआमच्या समद्या बामनांना अनुसुचित जाती मदी भरती करा. इतकं दिवस आमी मुकाट्यानं कायसुदिक बोललोन्हाई. त्वांड बंद करून लाथा अन् बुक्क्या सहन केल्या. पन आता आमी बोलनार. आमी बी इथलेच हाये अनआमाला बी आमचा वाटा मागायचा अधिकार हाये. तुमच्या राज्यात आमास्नी काय बी फुकट मिळत नाय. कुटलीबी सोय नाय की सवलत नाय. नोकरी करायची म्हनलं तर आधी समद्या जागा भरल्यावर आमचा इचार करत्यात. तशा आमच्याकडं बी जमिनी व्हत्या बगा, पन जरा कुटं आमी जम बसंवतोय तंवर या मायबाप सरकारनं काढूनघेतल्या. आता आमी इथं कुनाच्या तोंडाकडं बघत जगायचं, म्हनून आमी ठरवलं, आमच्या पोराबाळास्नीमरस्तवर शिकवायचं अन तिकडं अमेरिका देशात धाडायचं. किती बी पैका लागला तरी आमी उभं करू. हिकडूनतिकडून जोडून एकदा बुकात आकडा दाखवला की तिकडं सोडतात म्हनं. आमी आमच्या पोरापोरींना सांगूनठेवलंया, तिकडं कुनचं बी काम करायला लाजायचं नाय. एकाद्या दुकाना- हॊटेला बिटलात काम करून पै ला पैजोडायची. इथं आमची काळजी करायची न्हाई. आपली माती सोडावी लागली तरी काय बी बिघडत नाय तिकडंजावून एखांदा दिवस आपला मऱ्हाटी दिवस साजरा करा अन् ग्वाडध्वाड करून खावा. न्हाईतरी हितं ग्वाड खायचंम्हनलं तरी दिसभर चितळ्याकडं लाईन मदी थांबावं लागतंया. आता तर तेबी मिलनार नाय. काल गेलो व्हतोतिकडं तर तिथं भला मोठा बारड लावलया की तो चक्का अन श्रीखंड अनुसुचित जाती अन जमाती साटी राखीवआहे म्हनं, म्हंजे त्यांच्याकडचं समदयांचं प्वाटभर झालं की आमास्नी दोन दोन घास मिलन म्हनं. ते बघून आमचंबी डोसकं फिरलंया, तवा धरनं येक घास बी जाईना झालंय. डोसक्याचा पार भुगा झालाया. म्हनलं आता आपलंइथं काय खरं नाय. तडक आमी आपलं ते लक्षमन माने का कोन हायेत ना त्यांच्याकडं गेलो. इचारलं कि आमच्याबामनांचा कोन कैवारी हाये का न्हाई. ते म्हनले, तुमी पयलं येक काम करा, तुमी काय बोलता ते आमाला काय बीकळत न्हाय, तवा आमच्याकडची सुद भाषा शिकून घ्या, म्हंजे सरकारला बी कळंन. तुमी असुद बोललात तरकोनाला काय पन कलनार नाय. तवा आमी त्यांच्याकडं गेलो चांगलं ह्जार हजार देउन तिथं शिकायला गेलो. तवाथ्वाडं थ्वाडं सुद बोलता यायला लागलं अन तुमास्नी लिव्हायचं आमच्या टकुऱ्यात घुसलं. ते मानेसायब बीम्हनलं जरा सरकारला लिवून बिवून बगा काय व्हतं काय ते नाइतर आपुन बी जाहीर करू अन बुध्दाची दीक्षाघेऊन टाकू. ते म्हनलं या हिंदू धर्मात कायसुदिक राम ऱ्हायला न्हाई. थोड्या दिसांनी कुनी बी हिंदू सापडनार न्हाई. समदे बुध्दम् शरणम् गच्चामि असं म्हनतील. तवा मला बी बरं वाटलंया, म्हनलं इथं रोज रोज देव्हाऱ्यातल्यासमद्या देवांना अंघुळ घालायची गरज न्हाई, नुसतं बुध्दं शरणं असं म्हनलं की झालं. तसं सारखं सारखं राम कृष्णमारुती यांचं पाळनं हलवून सुंठवडा बी वाटावा लागनार न्हाई. नवरात, उपासतापास, सवाशन, मेहून कायसुदिकन्हाई. पर येक तेवढं खरं की आमच्यातल्या भिक्षूक समाजाला सपशेल नुकसान सोसावं लागंन. पन ते म्हनलं कीते आमच्यावर सोडा. आपुन त्यासनि स्पेशल सवलत जाहीर करू. समद्यांमधे ते जास्ती मागासलेले हायेत, त्यांनापोटापाण्यासाठी भिक्षा मागत फिरावं लागतंया असं आपन सांगू. अवो अनुसुचित जाती मध्ये येकदा आपुन घुसलोकी येवढं फायदे हायेत की थोडं सोसावं लागनारच न्हवं का?

मानेसायबांचं इचार आमास्नी लई पटलं. पन म्हनलं एक अडचण हाये बुवा. बुध्दं शरणं वरून आमच्या याइवल्याश्या टकुर्यात आलं बघा. रागावू नका तुमी, पन या धर्मात पन संस्कृत शिकाया लागतं व्हयं? तुमी हायेसाम्हून आतली बातमी सांगतोया आमाला बी संस्कृत येत न्हाई, इतक्या दिसपतूर आमी असंच घोकून कमवतोया, कोनाला सांगू नका बरं का. न्हाईतर समदा लोचा व्हायचा. पन मानेसायेब तसं चांगलं हयाती. ते म्हनलं अवो तसंकाय संस्कृत बि लागत न्हाय, फकस्त बुध्दं शरणं येवढच म्हनायचं. अवं या तळागाळातल्या लोकांस्नी कुठंयेतंया? तवा येक लक्षामदी ठेवायचं कि आपला इकासच झाला नाय. म्हनून तर ते मागासलेलं संस्कृत पाठ करावंलागतंया. अन आपल्याला काय बी कळत न्हाई असं दावायचं. तुमची येक वाईट सवय हाय बघा समद्यांनाशिकायची ख्वाड हाय. अवं शिकून कुनाचं भलं झालंया, तवा जितकं अडानीपनाचं ढ्वांग करता येईल तेवढंकरायचं, म्हंजी तुमचाच फायदा हाय.

तवा आता मायबाप सरकार, तुमी आमास्नी न्याय द्यायलाच पायजेल नायतर आमी अन आमचे त्या पल्याडचेबामन गप्प बसनार न्हाय. आमी बी अनुसुचित जाती मदी यायला पायजे. ते नाय झालं तर आमी मानेसायबांच्यासारखं ते धरम का काय म्हनत्यात ते बदलू. मंग सगळंच बुध्द व्हतीला. मग तवा समद्यास्नी सारखं वागवलंजाईल, न्हवं का?


तवा, राम राम, च्च्च्च चुकलंच बुध्दं शरणं असं म्हनून आमी हितंच थांबतुया. आमचा कायसुदिक राग मानू नका.
अन काय चुकलं माकलं तर आमास्नी माफी करा.

फकस्त तुमचा
अखिल बामन समाज.

Saturday, April 14, 2007

कविता मनातल्या

मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ॥

राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा
नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा ॥

अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्ताच्या जडदारी देशा ॥

भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धिच्या देशा
शाहिरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा ॥

ध्येय जे तुझ्या अंतरी निशाणापरी नाचते जरी
जोडी ये परलोकासी व्यवहारा परमार्थासी वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंडयाच्या एकची देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ॥

अपर सिंधुच्या भव्य बांधवा महाराष्ट्र देशा
संह्याद्रिच्या सख्या जीवलगा महाराष्ट्र देशा ॥

पाषाणाच्या देही करीसी तू हिरव्या वेशा
गोदा कृष्णा भीमा तुझिया ललाटीच्या रेषा ॥

तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वस्ती जनस्थानीची श्री रघुनाथांची ॥

भिन्न व्रुत्तीची भिन्न भिन्न ही भिन्न जीवतत्वे
तुझिया देही प्रकट दाविती दिव्य जीवसत्वे ॥

चित्पावन बुद्धिने करीसी तू कर्तबगारी
देशस्थाच्या खुल्या दिलाची तुजला दिलदारी ॥