Saturday, April 14, 2007

कविता मनातल्या

मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ॥

राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा
नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा ॥

अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्ताच्या जडदारी देशा ॥

भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धिच्या देशा
शाहिरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा ॥

ध्येय जे तुझ्या अंतरी निशाणापरी नाचते जरी
जोडी ये परलोकासी व्यवहारा परमार्थासी वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंडयाच्या एकची देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ॥

अपर सिंधुच्या भव्य बांधवा महाराष्ट्र देशा
संह्याद्रिच्या सख्या जीवलगा महाराष्ट्र देशा ॥

पाषाणाच्या देही करीसी तू हिरव्या वेशा
गोदा कृष्णा भीमा तुझिया ललाटीच्या रेषा ॥

तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वस्ती जनस्थानीची श्री रघुनाथांची ॥

भिन्न व्रुत्तीची भिन्न भिन्न ही भिन्न जीवतत्वे
तुझिया देही प्रकट दाविती दिव्य जीवसत्वे ॥

चित्पावन बुद्धिने करीसी तू कर्तबगारी
देशस्थाच्या खुल्या दिलाची तुजला दिलदारी ॥

No comments: